कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) विविध गट ड पदांच्या भरतीसाठीची प्रक्रिया सुरू होती. परंतु, आचारसंहिता लागू असल्यामुळे अर्जाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 23 नोव्हेंबरनंतर निवडणूक प्रक्रिया संपल्यावरच नवीन तारीख जाहीर होईल. अर्ज प्रक्रिया, पदांची माहिती, पात्रता, वेतन आणि परीक्षा पद्धती यासंदर्भात माहिती खालीलप्रमाणे आहे:
![]() |
| कोल्हापूर सरकारी गट ड पदभरती - अर्जाची तारीख पुढे सरकली! जाणून घ्या संपूर्ण माहिती |
पदांची माहिती
- पदांची संख्या: एकूण 102 जागा
- पदे: सिपाई, परिचर, मदतनीस, रक्तपेढी परिचर, अपघात सेवक, बाह्य रुग्ण सेवक, कक्ष सेवक (ऑड बॉय)
- वेतन श्रेणी: 15,000 ते 47,600 रुपये
- शुरुवातीचे मासिक वेतन: 25,000 रुपये (सर्व भत्त्यांसह)
पात्रता
- शैक्षणिक पात्रता: दहावी उत्तीर्ण
- वयोमर्यादा:
- खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
- राखीव प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे
अर्ज प्रक्रिया
- अर्ज पद्धत: ऑनलाइन (कोल्हापूर जीएमसी संकेतस्थळावर)
- फी:
- खुला प्रवर्ग: 900 रुपये
- राखीव प्रवर्ग: 0 रुपये
परीक्षा आणि अभ्यासक्रम
- परीक्षा पद्धत: संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा (CBT)
- विषय:
- मराठी
- इंग्रजी
- सामान्य ज्ञान
- बौद्धिक चाचणी
- अंकगणित
- परीक्षेचे गुण: 100 प्रश्नांसाठी 200 गुण
- निगेटिव्ह मार्किंग: लागू नाही
- कालावधी: दोन तास
निवड प्रक्रिया
- मूल्यमापन: परीक्षा गुणांवर आधारित, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
- सामाजिक आरक्षण: लागू
अर्जाची नवी तारीख कधी येईल?
- आचारसंहिता संपल्यानंतर 23 नोव्हेंबरनंतर नवीन तारीख जाहीर होण्याची शक्यता.
- या तारखेसाठी अद्यतन तुम्हाला वृत्तपत्रात व जीएमसी संकेतस्थळावर पाहायला मिळेल.
तयारी कशी करावी?
- अभ्यासक्रमानुसार तयारी करा.
- मागील जीएमसी नागपूर, वर्धा परीक्षांचे पेपर पाहून तयारी करा.
- Read Also https://www.infotrending24.in/2025/07/Vivo%20-V40-%205G.html

Post a Comment
0Comments